Wednesday, October 23, 2019

आ.बबनदादा शिंदे हेच शेतकरी व कष्टकरी जनतेचे खरे तारणहार

0

मानेगाव/प्रतिनिधी- (राजेंद्र गुंड)

  • माढा तालुक्यातील निमगांव (टें) येथील शिंदे कुटुंबियांचा जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण झाला आहे तो आमदार बबनदादा शिंदे यांनी 25 ते 30 वर्षांपासून केलेल्या भरीव विकासकामांमुळे याचा प्रत्यय अनेक वेळा जनतेस आला आहे.माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघात सामाजिक,औद्योगिक, सांस्कृतिक,शैक्षणिक,कृषी क्षेत्रात केलेल्या कामामुळेच शेतकरी व गोरगरीब कष्टकरी जनतेचे खरे तारणहार ठरले आहेत. ते 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करतात म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही कामासाठी आलेल्या प्रत्येक माणसाची विचारपूस करणे मग तो आपल्या पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा हे बबनदादांनी कधीच पाहिले नाही म्हणून तर जनतेचे त्यांच्यावर अपार प्रेम व श्रद्धा आहे.

आ. बबनदादा शिंदे यांनी भिमा-सीना जोडकालवा,सीना माढा उपसासिंचन योजना, पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पद्मश्री डाॅ.तात्याराव लहाने व डाॅ.रागिणी पारेख यांच्या सहकार्याने दरवर्षी माढेश्वरी अर्बन बँकेच्या वतीने मोफत नेञरोग चिकित्सा व शस्ञक्रिया शिबिराचे आयोजन,मोफत सामुदायिक विवाह सोहळा,जेष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी व बुद्धगया याञा,रक्तदान शिबिरे, मोफत रोगनिदान शिबीरे, पाणी फौंडेशनच्या कामासाठी कारखान्याच्या माध्यमातून आर्थिक मदत व सहकार्य, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय,गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप,ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊसाला सातत्याने सर्वाधिक दर तसेच सध्याच्या भयंकर दुष्काळी परिस्थितीत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात 40 चारा छावण्या सुरू करून जवळपास 26 हजार लहान व मोठ्या जनावरांचे संगोपन केले,
काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टीमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 10 हजार पूरग्रस्तांना मोफत जेवणाची सोय केली तसेच आर्थिक मदत व सहकार्य करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 लाख 5 हजार रुपये दिले. संकटात सापडलेल्या शेतक-यांना व पूरग्रस्तांना भरीव मदत व सहकार्य करून फार मोलाचे सामाजिक कार्य केले आहे हे जनता कदापिही विसरू शकणार नाही.अशा अनेक सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील विकास कामांमुळेच त्यांची ओळख लोकाभिमुख कामे करणारा लोकप्रतिनिधी म्हणून झाली आहे.म्हणूनच जनतेने आ.बबनदादांना सलग 5 वेळा विक्रमी मताधिक्यांनी निवडून दिले याकामी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

माढा तालुक्याचे नाव आ.बबनदादा शिंदे यांनी साखर कारखानदारीच्या क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित करून देश पातळीवरील पोहचवले आहे पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, म्हैसगाव येथील विठ्ठल शुगर्स, कर्नाटकातील इंडियन शुगर, केवड येथील बबनरावजी शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज, करमाळा येथील कमलाभवानी शुगर असे विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून दरवर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी गाळप केले जाते. या प्रत्येक साखर कारखान्यामध्ये शेकडो अधिकारी व हजारो कर्मचारी यांनी संधी देऊन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्रपंच उभे राहिले आहेत त्यामुळे हे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यांना आपल्या हक्काचा देवमाणूस म्हणून संबोधतात.आ.बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माढेश्वरी अर्बन बँकेने विविध सामाजिक व सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली आहे. बँकेच्या विविध ठिकाणी 8 शाखा असून बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. सध्या बँकेचे 10785 सभासद असून 156 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.
बँकेने केलेला उत्कृष्ट कारभार व पारदर्शकतेची दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील व्दितीय क्रमांकाचा बँको पुरस्कार 2017 तसेच 2008 मध्ये दिल्लीचा नॅशनल बँकिंग एक्सलन्स अवार्ड, 2010 मध्ये सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचा आदर्श बँक पुरस्कार, 2012 मध्ये सोलापूर जिल्हा सहकार विभागाचा आदर्श बँक पुरस्कार , 2016 मध्ये सोलापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचा आदर्श बँक पुरस्कार, 2016 मध्ये सोलापूर जिल्हा सहकार विभागाचा आदर्श संस्था पुरस्कार , 2016 मध्ये 75 ते 100 कोटी व्यवसायाचा राष्ट्रीय पातळीवरील बँकोचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार,कोल्हापूर येथील बँको ब्लू रिबन पुरस्कार-2018-19 हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 100ते 150 कोटी ठेवींकरिता मिळाला आहे तसेच ज्या सभासदांनी एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्ञक्रिया केली आहे त्यांच्या 34 मुलींना गार्गी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला आहे.भविष्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.

माढा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याने त्यांनी अनेक लोकाभिमुख व लोकोपयोगी कामे सातत्याने केली आहेत. विकासाचा वेध घेण्याची दृष्टी त्यांच्याकडे असल्याने शेती, सिंचन,वीज, शिक्षण, उदयोग यांच्यासह पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.सोलापूर जिल्हा दूध संघाची भरभराट यासारख्या ठोस व दीर्घकाल उपयुक्त असणाऱ्या कामांबरोबरच वीजेचे ट्रान्सफॅार्मर, कुर्डूवाडी येथे पंचायत समितीची भव्य इमारत,टेंभूर्णी येथे एमआयडीसीचा विकास, बेंद ओढा खोलीकरण व रूंदीकरण प्रकल्प, सिमेंट काँक्रीट व डांबरीकरणाचे रस्ते, जिल्हा मार्ग,पालखी मार्ग,गावोगावी हायमास्ट लँम्प, समाजमंदिर, सांस्कृतिक भवन, सभामंडपे,विविध वित्त आयोगातील विकास कामे, पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते डांबरीकरण, रिधोरे येथील सीना नदीवरील पुल,प्राथमिक आरोग्य केंद्रे, माढ्यात ग्रामीण रूग्णालये,पाणीपुरवठा योजना,अंगणवाडी इमारती , संजय गांधी,इंदिरा गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी वीज उपकेंद्रे व ट्रान्सफॅार्मर बसविणे यासारखी सामान्य माणसाला उपयुक्त ठरणारी कोटयावधी रूपयांची कामे व्यक्तिशः लक्ष घालून केली.हाती घेतलेले प्रत्येक काम आदर्शवत पध्दतीने पूर्ण करून तडीस नेण्याची त्यांची हातोटी व सतत काम करत राहण्याची वृत्ती व कामाचा जबरदस्त मोठा आवाका यामुळे सामान्य माणासाच्या ओठावर आ.बबनदादा शिंदेचे नाव आहे. भीमा-सिना जोड कालवा तर मंत्रीपदाची ऑफर नाकारत सामान्य माणसासाठी ऐतिहासिक काम केले आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने कमी कालावधीत विक्रम करीत अऩेक पुरस्कार पटकाविले.नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन को.अॅाप.शुगर फॅक्टरीजचे देश पातळीवरील दोन व वसंतदादा शुगर इन्स्टिटयुट,पुणे यांचे 9 पुरस्कार विठठलराव शिंदे कारखान्याला मिळाले आहेत. कारखान्याच्या प्रगतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. सन 2017-18 मधील देशातील सर्वात जास्त ऊस गाळपाचा पुरस्कार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. कारखान्याने मिळविलेले सदरचे यश हे अल्पवधीत केलेली भरीव प्रगती,मालाचा दर्जा,उत्तम आर्थिक व्यवस्थापन,उच्च तंत्रज्ञान,काटकसर व कारखान्याचे चेअरमन आ. बबनदादा शिंदे यांचे कुशल व कल्पक मार्गदर्शन आणि दूरदृष्टीमुळेच विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर काऱखान्याला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. भविष्यात मोडनिंब व माढा येथे एमआयडीसी सुरू करणे,अद्ययावत शैक्षणिक संकुल उभे करणे,सीना माढा उपसासिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करणे,तालुक्यातील रस्ते डांबरीकरण करणे, हाॅस्पीटल व आरोग्य सुविधा उपलब्ध करणे, भीमा व सीना नदीवर बॅरेजेस बांधण्यासाठी त्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.आ. बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियांकडून अशीच समाजसेवा घडत राहो हीच अपेक्षा आहे.

अंजनगाव खेलोबा येथील धनगर समाज आ.बबनदादांच्याच पाठीशी

0

मानेगाव/ प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड)

  • माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील धनगर समाज राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांनी गोरगरीब जनता व कष्टकरी शेतक-यांना सातत्याने मदत व सहकार्य केले आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबा वाघमोडे व शिवाजी वाघमोडे यांनी आ.शिंदे यांना सुस्ते ता.पंढरपूर येथील सभेत पाठिंबा दिल्यानंतर बोलताना सांगितले.

याप्रसंगी आ.बबनराव शिंदे यांनी सर्व समाज बांधवांचे स्वागत करून गाव पातळीवरील गट-तट विसरून निवडणूकीत सहकार्य करण्याचे आवाहन करीत यापुढेही गावातील प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

धनगर समाजाचे नेते बाबा वाघमोडे व शिवाजी वाघमोडे यांनी सांगितले की,नुकतेच अंजनगाव खेलोबा येथील माजी पंचायत समिती सदस्य आप्पासाहेब वाघमोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे समाजातील इतर लोक नेमकी कोणती भूमिका घेणार ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते परंतु आम्ही आ.बबनदादा शिंदे यांनी आत्तापर्यंत गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे तसेच दुष्काळी परिस्थितीत गावात 3 चारा छावण्या सुरू करून पशुधन वाचविले त्यामुळे आम्ही त्यांच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.आप्पासाहेब वाघमोडे यांनी घेतलेला शिवसेना प्रवेशाचा तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आ.बबनराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सूभाष माने,जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, बबन पाटील, संदीप पाटील, दिपक खोचरे,शिवाजी तुकाराम वाघमोडे, बाबासाहेब वाघमोडे, नानासाहेब वाघमोडे,महादेव वाघमोडे, महादेव श्रीपती वाघमोडे, बिरुदेव वाघमोडे, शंकर वाघमोडे, विठ्ठल कोळेकर, सुरेश वाघमोडे, दशरथ वाघमोडे, पांडूरंग चौगुले,उपसरपंच भागवत चौगुले, प्रदिप चौगुले, नवनाथ इंगळे, धनराज पाटेकर,महादेव गोरे, प्रशांत इंगळे,अंकुश लटके, संजय चौगुले, सुभाष लटके,तानाजी पाटेकर,बिभिषण सुतार, दादासाहेब वाघमारे,अनंत पाटेकर, पांडूरंग पाटेकर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिग्विजय बागल यांना उच्च न्यायालयाचा दणका : बाजार समिती संचालकपद रद्दच

0
  • करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे दिग्विजय बागल यांचे संचालकपद रद्द करण्याचा पणन संचालकांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला . जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप यांनी दिग्विजय बागल यांचे संचालकपद अपात्र ठरविणे विषयी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे अपील दाखल केले होते . यामधे शंभुराजे जगताप यांचे अपील मान्य करत पणन संचालकांनी बागल यांचे सदस्यत्व रद्द केले होते .या विरोधात बागल यांनी मुंबई उच्च न्यायालयात दोन वेगवेगळी अपीले दाखल केली होती . यावर जस्टीस आय. महंती , नितीन बी . सुर्यवंशी , एस एस शिंदे यांचे खंडपीठासमोर सुनावणी होवुन न्यायालयाने बागल यांचे अपील फेटाळुन लावत पणन संचालकांचा निर्णय कायम ठेवला . यामधे जगताप यांचे वतीने अॅड सारंग सतीश आराध्ये यांनी तर बागल यांचे वतीने अॅड . अभिजीत कुलकर्णी , अॅड जहागीरदार , अॅड हांडे यांनी काम पाहीले . ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाला हा मोठा धक्का असुन जगताप गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे . या विषयी प्रतिक्रिया देताना जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जगताप म्हणाले कि , भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही . अखेर सत्याचाच विजय झाला असुन ये तो शुरुवात है आगे आगे देखो होता है क्या अशी मार्मिक प्रतिक्रिया दिली .

बॅकवाॕटरचे प्रश्न सोडवू – संजयमामा शिंदे .

0


प्रतिनिधी
उजनी धरणावरुन ओलिताखाली आलेल्या गावांच्या समस्या ह्या इतर गावांपेक्षा वेगळ्या असतात .या समस्यांची आपल्याला जाणीव आसून भविष्यकाळात या गावातील प्रश्न आपण प्रामुख्याने सोडवू असे प्रतिपादन सांगवी येथील कॉर्नर सभेप्रसंगी संजयमामा शिंदे यांनी केले. शिंदे यांनी आज सकाळी सातोली , वडशिवणे, सांगवी नं १ ,बिटरगाव सां ,सांगवी २ या गावांना भेटी दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की बॕकवाॕटरला वीज , पाणी , रस्ता , उसाचा प्रश्न , उस वाहतुकदारांचे प्रश्न , उजनीच्या प्रदुषित पाण्याचा बनत चाललेला गंभीर प्रश्न तसेच उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या बसणार्या झळा याची आपल्याला जाणीव असल्यामुळे ह्या समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ.उजनी धरणातून वितरीत होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यावर भर देऊ .टेंभूर्णी – अहमदनगर महामार्गाचा प्रश्न सोडवू.त्यामुळे या महामार्गाच्या भोवती अनेक व्यावसायिक संधी निर्माण होतील.हे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळात करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , पै,चंद्रहास बापू निमगिरे ,विलासदादा पाटील ,माढा तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष धनंजय मोरे, अॕड.जालिंधर बसळे ,सुहास साळुंखे ,समाधान भोगे,आण्णासाहेब पवार ,सर्जेराव फरतडे ,वैजिनाथ कदम ,संतोष कोडलिंगे ,दिलीप कोडलिंगे , बालाजी देवकर ,शांतीलाल कदम ,वैभव तळे ,शिवाजी डोंगरे या कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलसिंचन प्रकल्प राबविल्यानेच तालुक्यात 5 साखर कारखाने- आ.बबनदादा शिंदे

0

मानेगाव/ प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड)

  • माढा विधानसभा मतदारसंघात सीना-भिमा जोडकालवा व सीना माढा उपसासिंचन योजनेच्या निधीसाठी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करून राबविल्यानेच ऊसाचे हजारो एकर क्षेत्र वाढले परिणामी तालुक्यात 5 साखर कारखान्याच्या माध्यमातून लाखों टन ऊसाचे गाळप होत असून त्याचा फायदा गोरगरीब व कष्टकरी शेतक-यांना होत असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस व मिञ पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.

ते माढा तालुक्यातील जामगाव, वडाचीवाडी (अं.उ), हटकरवाडी , कापसेवाडी, धानोरे येथील प्रचारार्थ सभेत बोलत होते.

पुढे बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,बार्शी उपसासिंचन योजनेत माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे,वडाचीवाडी व तांदुळवाडी या गावांचा समावेश आहे त्यामध्ये जामगावचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच सीना नदीवरील खैरावच्या बंधा-यातून उपसासिंचन योजनेच्या माध्यमातून धानोरे येथील देवीच्या माळावर मोठ्या टँक मध्ये पाणी साठवून धानोरे,हटकरवाडी, कापसेवाडी,बुद्रुकवाडी व मानेगावच्या पूर्व भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना मार्केट कमिटी चे उपाध्यक्ष सुहास पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत आ.बबनदादांनी 46 चारा छावण्या सुरू करून 27 हजार जनावरांचे संगोपन केल्याने गोरगरीब शेतक-यांना मोठी मदत झाली आहे. या भागातील वीज,रस्ते, शाळा खोल्या व सिमेंट बंधा-यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

याप्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे सिद्धेश्वर घुगे म्हणाले की, सध्याचे युतीचे सरकार हे भूलथापा मारणारे आहे त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक भिजत ठेवला आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे त्यामुळे शेतक-यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी उपसभापती बाळासाहेब शिंदे,सरपंच सुहास पाटील,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक दादासाहेब तरंगे,अमोलनाना चव्हाण,हनुमंत पाडूळे, लक्ष्मण देशमुख,अनिल देशमुख,उल्हास राऊत,गणेश काशिद,भारत देशमुख, काॅग्रेसचे माढा तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, रामभाऊ वाघमारे,धनंजय मोरे, शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील,सत्यवान गायकवाड, प्रशांत चव्हाण,संदीप पाटील, मधुकर चव्हाण,चेअरमन विठ्ठल भोईटे,तात्यासाहेब भोईटे,पोपट खापरे सरपंच राजेंद्र खोत, मोहन क्षीरसागर, सज्जन देशमुख, तानाजी देशमुख,विलास देशमुख,शिवशंकर गवळी,सत्यवान खोत,मंगेश देशमुख, मधुकर पाटील, साहेबराव गवळी,नितीन कापसे,जालिंदर कापसे,श्रावण खोत,मुकुंद गवळी, वैजिनाथ व्हळगळ,अनंता बगडे,तानाजी लांडगे,शशिभाऊ जगताप, रोहिदास बगडे, नाना सदगर, नेताजी कापसे, पांडूरंग कौलगे, मिटू जगताप, पिंटू नागटिळक, श्रीकांत मुळे, गोपीनाथ गवळी, शाहीर चव्हाण,अंकुश कापसे, सुधीर मस्के,जगन्नाथ कापसे,मच्छिंद्र गवळी,शिवराम न्हावकर, बबन पवार
यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातुन मताधिक्य देऊ:नानासाहेब मोरे

0

करमाळा-माढा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातुन जास्तीत जास्त मताधिक्य मिळवुन देऊ असे मनसे तालुकाध्यक्ष नानासाहेब मोरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
यावेळी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की संजय मामा शिंदे यांनी जिल्हा परिषद च्या माध्यमातून करमाळा तालुक्यात विकासाचे अनेक कामे केली असुन तालुक्यातील प्रत्येक गावात जिल्हा परिषद चा निधी दिला आहे त्यांनी अगोदर काम केलय मगच मत मागीतले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संजय मामा शिंदे यांना विजयी करण्यासाठी गावा गावात जाऊन प्रचार करत आहे असे ते म्हणाले

माढा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावरच निवडणूकीला सामोरे – आ.बबनराव शिंदे

0

मानेगाव/ प्रतिनिधी-(राजेंद्र गुंड)

  • माढा विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनता व कष्टकरी शेतक-यांच्या हितासाठी नवीन सब स्टेशन्स,जलसिंचन योजना,रस्ते डांबरीकर,नवीन शाळा व अंगणवाडी इमारती,साखर कारखाने,सिमेंट बंधारे,प्राथमिक आरोग्य केंद्र,हायमास्ट लँम्प,चारा छावण्या,सभामंडप,सामुदायिक विवाह सोहळा,नेञशस्ञक्रिया शिबिर, काशियाञा,हजारो बेरोजगारांना रोजगार, गावोगावी समाजमंदिरे यासारख्या अनेक लोकोपयोगी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच निवडणूकीला सामोरे जात असल्याचे प्रतिपादन माढा विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांनी केले.

ते माढा तालुक्यातील मानेगाव, बुद्रुकवाडी,खैराव,अंजनगाव उमाटे येथील येथील प्रचारार्थ सभेत बोलत होते.

पुढे बोलताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की,मागील 30 ते 35 वर्षांच्या काळात मी पंचायत समिती,जिल्हा परिषद,दूध संघ,जिल्हा मध्यवर्ती व माढेश्वरी अर्बन बँक,साखर कारखाने आणि आमदारकीच्या माध्यमातून मतदारसंघात अनेक योजना व प्रकल्प राबवित अनेक क्षेत्रात नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. विशेषतः माढा तालुक्याची ओळख सर्वांधिक ऊसाचे गाळप करणारा म्हणून देशपातळीवर झाली आहे शेतक-यांना न्याय मिळवून देत त्यांची क्रयशक्यी व उत्पादन शक्ती वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रवादी विद्यार्थ्यी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील म्हणाले की, आ.बबनदादा शिंदे यांनी माढा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्याचे सांगत भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे फसव्या घोषणा करणारे आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.या सरकारच्या हुकूमशाही पद्धतीच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला.

याप्रसंगी उपसभापती बाळासाहेब शिंद,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निलकंठ पाटील,दादासाहेब तरंगे, अमोलनाना चव्हाण,हनुमंत पाडूळे,माजी उपसभापती उल्हास राऊत,चेअरमन विठ्ठल भोईटे,अरविंद चव्हाण,सरपंच संदीप पाटील, विलास कौलगे, गणेश काशिद,सरपंच रमेश उमाटे,रमेश पाडूळे,पंडित पाटील,शरद नागटिळक,शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सिद्धेश्वर घुगे ,सत्यवान गायकवाड,नितीन कापसे, वैजिनाथ व्हळगळ,दिपक भोसले,तानाजी लांडगे,रामेश्वर नागटिळक,तात्यासाहेब पारडे, शिरीष बारबोले, शिवाजी भोगे,बाबासाहेब पारडे,कांतीलाल माने, आप्पासाहेब पवार,जाफर पटेल,पोपट काशिद,अन्वर शेख,अंगद पाटील,अशोक शेळके,नंदू देशमुख,पंडित ढवण,विठ्ठल पाटील,शंकर नागणे,दिनकर नागटिळक शहाजी सुर्वे,लहू जगदाळे, भिमराव क्षीरसागर,श्रीहरी आतकरे यांच्यासह ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माढा तालुका कांग्रेस कमिटी व मातंग एकता आंदोलन संघटनेचा ह्यांना पाठींबा

0

माढा तालुका काँग्रेस कमिटी व मातंग एकता आंदोलन संघटना यांच्या वतीने आयोजित कार्यकर्ते मेळावा मोडनिंब तालुका माढा येथे कार्यक्रमात जिल्हा परिषद चे सदस्य रणजितसिंह शिंदे,माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर,जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना संचालक बबनराव पाटील,माढा तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष धनंजय मोरे,मातंग एकता आंदोलन संघटना जिल्हा अध्यक्ष रामभाऊ वाघमारे,काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष सौदागर जाधव,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष रफिक शेख,सुरेश कुमार लोंढे,जहीर मणेर,नागनाथ वाघमारे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बबनराव शिंदे यांना विजयी करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.

करमाळा विधानसभा मतदार संघाचे ह्या उमेदवाराने दिला अपक्ष उमेदवारास पाठींबा

0

ब्रेकिंग न्यूज

करमाळा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री.संजय पाटील घाटणेकर यांचा वीट ता.करमाळा येथील सभेत अपक्ष उमेदवार श्री.संजयमामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा…

संजयमामा शिंदेंना पाठिंबा

0

शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचं तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज नारायण पाटील यांनी सेनेचा राजीनामा देऊन, अपक्ष उमेदवारी दाखल केली. रश्मी बागल यांच्यापुढे आधीच नारायण पाटील यांचं आव्हान असताना, आता संजयमामा शिंदे यांना जयवंतराव जगतापांनी पाठिंबा दिल्याने, रश्मी बागल यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं आहे. करमाळ्यात शिवसेनेकडून रश्मी बागल, राष्ट्रवादीकडून संजय पाटील घाटनेकर यांच्यात थेट लढत होत आहे. तर नारायण पाटील आणि संजय शिंदे हे दोन्ही तगडे उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत.

सोलापूर : करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. कारण माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयवंतराव जगतापांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, संजय शिंदे यांना पाठिंबा दिल्याने, संजय शिंदे यांचं पारडं काहीसं जड झालं आहे.

नारायण पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुखांना राजीनाम्याचा इशारा देत करमाळ्याची जागा प्रतिष्ठेची करून माझी उमेदवारी कापली, असा आरोप शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी केला. शिवसेनेने नारायण पाटील यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज आहेत. उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष अर्ज भरला आहे.